औरंगपुरा येथील गेस्ट हाऊसमध्ये चोरी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : औरंगपुरा
परिसरातील गोकुळवाडी भागात असलेल्या साई आनंद गेस्ट हाऊसमध्ये एका सेल्समनच्या बॅगमधून ७० हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ जुलै २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय बाबुभाई त्रापसिया (वय २७, रा. अमरेली, गुजरात, ह.मु. औरंगपुरा) यांनी तक्रार
दिली आहे. फिर्यादी अक्षय हे गेस्ट हाऊसमध्ये थांबलेले असताना, आरोपी रुपेश रघुनाथ तोडकर (वय ४५, रा. एमआयडीसी, जि. सातारा) याने त्यांच्या बॅगची चेन उघडून आतील ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी रुपेश तोडकरविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक उत्तम जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार मजिद पटेल करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions